गोलवाडी जवळ अपघात ; कंटेनरखाली सापडून महिला ठार

वैजापूर,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-कंटेनरने हुलकावणी दिल्याने मोटारसायकल घसरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई नागपूर महामार्गावर गोळवाडी शिवारात रविवारी(ता.2)दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. शुभांगी गणेश भोपळे (25) रा.जोरे वस्ती वैजापूर असे मयत महीलेचे नाव आहे.

शुभांगी या आपला मुलगा व पुतण्या यांना घेऊन पती बरोबर लासुरगाव येथे देवी दाक्षायणीच्या दर्शनासाठी मोटारसायकल वर जात होत्या.त्यावेळी गोळवाडी शिवारात समोरून येणाऱ्या कंटेनरने (एन. एल. 01 एफ. सी.3264) त्यांच्या मोटारसायकलला हूल दिली. त्यामुळे मोटारसायकल घसरून दोघे पती पत्नी व दोन मुले खाली पडले.त्याचवेळी शुभांगी या कंटेनरच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागेवर मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, ज्ञानेश्वर पाडळे,रावते यांनी घटनास्थळी भेट दिली.वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शुभांगी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.शुभांगी यांच्या पश्चात पती व एक मुलगा असा परिवार आहे.