वैजापुरात “इंडियन स्वच्छता लीग” युवा सहभागाने राबविण्यास सुरुवात

17 सप्टेंबरपासून शहर स्वच्छतेस सुरुवात 

वैजापूर,१९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- भारत सरकार व महाराष्ट्र राज्यांनी स्वच्छता कार्याला गती यावी व ती युवक ते जेष्ठ नागरिकांच्या सहभागाने समाजातील प्रत्येक घटकात बिंबविल्या जावी म्हणून देशभर “इंडियन स्वच्छता लीग” युवा सहभागाने राबविण्यास 17 सप्टेंबर पासून आरंभ झाला आहे.

02 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ नगर परिषदेच्या वतीने 17 सप्टेंबर 2022 रोजी नारंगी नदीचा धरण परिसर, हुतात्मा स्मारक परिसर  स्वच्छ करण्यात आला.

या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचा गट “वैजापूर जाएन्ट्स” या नावाने सहभागी झाला होता. या उपक्रमात विनायकराव पाटील महाविद्यालयाचे एन.एस.एस चे छात्र, एन.सी.सी.छात्र तसेच सेन्ट मोनिका इंग्लिश शाळेचे छात्र, शहरातील सामाजिक संघटना कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक संघ सदस्य, नगरसेवक यांनी सहभाग नोंदवून स्वच्छता केली. यात तहसीलदार राहुल गायकवाड, नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, मुख्याधिकारी भागवत बिघोत, डॉ. दिनेश परदेशी, स्वच्छतादूत धोंडिरामसिंह राजपूत यांच्यासह नगरसेवक व कर्मचारी सहभागी झाले होते. या उपक्रमाचे नोडल ऑफिसर म्हणून अभियंता एम.एच.मोदानी व अभियंता श्री.चिमटे हे नियोजनबद्ध आखणी करून अंमलबजावणी करीत आहेत.