वैजापूर तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा आ.बोरणारेंकडून पुरस्कार देऊन सत्कार

वैजापूर,१९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा आ. रमेश पाटील बोरणारे यांनी रविवारी (ता.18) पुरस्कार देऊन सत्कार केला.

शहरातील मुरारी पार्क भागातील आ.बोरणारे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास मा. नगराध्यक्ष साबेरखान अमजदखान, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, अंकुश पाटील हिंगे, जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव, गटविकास अधिकारी एच.आर.बोयनर,  गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर, राजेंद्र पाटील साळुंके, खुशालसिंग राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी बी.के.म्हस्के, राजेंद्र साळुंके, नगरसेवक सखाहरी बर्डे, इम्रान कुरेशी, पारस घाटे, डॉ. निलेश भाटीया, सलीम वैजापूरी, सुलभाताई भोपळे, पदमाताई साळुंके, प्रभाकर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.