विविध प्रश्नासंदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यांची तहसीलदार गायकवाड यांच्याशी चर्चा

वैजापूर,१६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे यांनी गुरुवारी (ता.15) तहसीलदार राहुल गायकवाड यांची भेट घेऊन पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासंदर्भात व जनावरांच्या लंम्पी आजारावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली.
पावसामुळे काही भागात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे तसेच सध्या जनावरांना लंम्पी आजार आढळून येत असून तालुक्यात जनावरांचा सर्व्हे करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी श्री. गलांडे यांनी केली. 
या बैठकीस मनसेचे तालुकाप्रमुख सुनील गायकवाड, बाळासाहेब जानराव (खंडाळा), बाजार समितीचे संचालक सुरेश आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते नवनाथराव गायकवाड, पोलीस पाटील सुधाकरराव शेळके, तलाठी संघटनेचे अध्यक्ष साळवे अप्पा, आप्पासाहेब काळे, युवासेनेचे राजू पाटील गलांडे आदी उपस्थित होते.