वैजापूर तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते सोमवारी मोफत बियाणे वाटप

वैजापूर ,१२ जून  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुका भाजपच्यावतीने तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्याहस्ते सोमवारी आयोजित करण्यात आला आहे.
तालुक्यातील लासुरगांव सर्कलमधील पालखेड, बल्लाळीसागज, गोलवाडी, जळगांव, बेंदवाडी, दहेगांव, टाकळीसागज,शिवराई, हडसपिंपळगांव, शहाजतपूर या गावांतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याहस्ते पालखेड येथे सकाळी 9 ला होईल. त्यानंतर धोंदलगाव येथे सकाळी 10 वाजता करंजगांव, संजरपूरवाडी, भायगांवगंगा, अमानतपुरवाडी, सोनवाडी, लासुरगांव, परसोडा या भागातील शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, युवा मोर्चाचे राज्य कार्यकारणी सदस्य हर्षवर्धन कराड, जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके,अभय पाटील चिकटगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पैठणपगारे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जगताप, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा चिटणीस मोहनराव आहेर, नारायण तुपे, डॉ. राजीव डोंगरे, भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे नबी पटेल यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी व तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे यांनी दिली.