पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यानेही केला कमी; सुमारे २५०० कोटींचे नुकसान

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी पद्म पुरस्काराकरिता शिफारसयोग्य प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

मुंबई,२२ मे /प्रतिनिधी :- मोदी सरकारनंतर आता ठाकरे सरकारने सर्वसामांन्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल-डीझेल आणखी स्वस्त झालं आहे. राज्य सरकारने मुल्यवर्धित करात घट करण्याचा निर्णय घेतला आहे.  केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.

केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्यानंतर राज्य सरकारवर इंधनाच्या दरात कपात करण्याचा दबाव वाढला होता. तसेच राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर राज्य सरकारने व्हॅट कमी केल्याने महागाईने पिचलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर

व्हॅट कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल १०९ रुपये २७ पैसे प्रतिलिटर दराने तर डिझेल प्रति लिटर ९५ रुपये ८४ पैसे उपलब्ध होणार आहे.