अप्पर जिल्हा न्यायालय वैजापूर वकील संघाच्या अध्यक्षपदी किरणकुमार त्रिभुवन तर सचिवपदी वैभव ढगे यांची निवड

वैजापूर ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- अप्पर जिल्हा न्यायालय वैजापूर वकील संघाची गुरुवारी (ता.24) निवडणूक होऊन अध्यक्षपदी किरणकुमार त्रिभुवन हे निवडून आले.उपाध्यक्षपदी व्ही.जी.वाघ व सचिवपदी वैभव ढगे यांची निवड करण्यात आली. 

Displaying FB_IMG_1645716321812.jpg

अप्पर जिल्हा न्यायालय वैजापूर वकील संघाची सन 2002-03 या एक वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची आज निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून मजहर बेग यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून योगेश थावरे यांनी काम पाहिले.खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली.  वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विधीज्ञ प्रमोद जगताप, आसाराम रोठे, नानासाहेब जगताप, सचिन दहिभाते, राफे हसन, सचीन जानेफळकर, दत्तात्रय जाधव, संजय बत्तीसे, सईद अली, महेश कदम, देवदत्त पवार, प्रवीण साखरे, समीर जोशी, ज्योती शिंदे कापसे, अनुराधा उबाळे, प्रतापराव निंबाळकर, सय्यद यासर आदींनी अभिनंदन केले आहे.