दाऊदचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचे सहकारी होणं चांगलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाडा वॉटरग्रीडसाठी १००० कोटींचा निधीची तरतूद– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टीका करणे विरोधकांचा धंदा, त्यांना कामाने उत्तर देऊ

पैठण ,१२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदी-शहांचा सहकारी होणं चांगलं. आम्हाला साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांची आम्ही त्याच साबणाने धुलाई केली, अशी खरमरीत टीका सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

May be an image of 5 people, people standing and outdoors

मुख्यमंत्री शिंदे यांची पैठणमध्ये जाहीर सभा झाली.यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड जी, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, आमदार दीपक जयस्वाल, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार प्रा.रमेश बोरनारे, आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Image

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. बाळासाहेबाची खरी शिवसेना कोणती या प्रश्नाचे उत्तर आजच्या सभेतील गर्दीने दिले आहे. कुणी जबरदस्ती पैसे देऊन येथे आले नाही. हे लोक येथे प्रेमाने सभेसाठी आले आहेत, असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केला.

Image

बाळासाहेबांची खरी शिवसेना कुठही याचं उत्तर आजच्या या सभेने दिली आहे. पैसे देऊन जमवलेली ही गर्दी नाही. प्रेमाने आलेली ही गर्दी आहे. ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाला पसंती देणारी ही गर्दी आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी एकच शिकवण दिली आहे. जे होणार असेल तेच बोला. मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वत:चं ही ऐकत नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

May be an image of 4 people, people standing, flower and road

‘जेव्हा अन्याय झाला, मुस्कट दाबी झाली. सत्तेतील इतर घटकपक्षाकडून जे जे झालं ते सगळ्यांना माहित आहे. तेव्हा इतर आमदार म्हणाले असं झालं तर पुढे काही खरं नाही. तेव्हा मला वाटलं भूमरे नाना बोलतील तसं धाडस करतील का? पण ते धाडसी निघाले.’

‘आपला कार्यक्रम करण्याची तयारी झाली होती. पण 50 जण सगळ्यांना पुरुन उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो. माझ्यासोबत अनेक मंत्री होते. 50 आमदारांनी निर्णय घेतला हा जगातील एक इतिहास आहे. तुमच्या ही मनात प्रश्न होता काय होईल.’

May be an image of 4 people and people standing

‘2 वर्षात सर्व नकारात्मकता पसरली होती. मी आणि देवेंद्र जी यांनी निर्णय घेतला. सर्व सण धुमधडाक्यात होऊ द्यात. लोकांसाठी शिवसेना-भाजपचं सरकार स्थापन केलं. जिकडे तिकडे जातो तिकडे आतुरतेने वाट पाहत आहेत. सगळ्यांना वाटतंय हा आपल्यातला मुख्यमंत्री आहे. असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला, मविआला पुरून उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि आम्ही विरोधकांकडे गेलो. पन्नास आमदार विरोधकांच्या गोटात जातात हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आमच्यामागे लाखो लोकांचे आशीर्वाद होता. मला भाजप, शिवसेनेच्या लोकांनी माझी स्तुती केली. मी चांगले काम करुन त्यांचा वनवास संपवला. अडीच वर्षे समाजात नकारात्मक भाव होते. आम्ही हे जाणले आणि लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी पाऊले उचलली. लोकभावनेला हात घालून दहिहंडी आणि गणेशोत्सवातील बंधने मोकळी केली. फोटो काढायला लोक माझ्याकडे येतात. मी कधीच फोटोग्राफर घेऊन जात नाही. बाकी लोक कुठे कॅमेरे घेऊन जातात मला माहीत नाही. त्यांचे त्यांनाच माहीतेय. काही लोक म्हणतात, मुख्यमंत्री घरच्या गाठीभेटी घेतात. पण मी सांगतो कालपर्यंत मी त्यांच्याकडे जात होतो. आज मुख्यमंत्री झालो तर मी त्यांच्याकडे का जाऊ नये. लोक मला म्हणतील की, हा बदलला. मी माझ्यातील कार्यकर्ता मरू देणार नाही.

May be an image of 4 people and people standing

मुख्यमंत्री म्हणाले, टीका करणे विरोधकांचा धंदा आहे, त्यांना टीका करू द्या. सुप्रीया सुळे म्हणाल्या की, अजित पवार पहाटे सहापासून कामाला लागतात. मी त्यांना सांगतो की, मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांचे काम करतो. चांगले काम आपल्याला करायचे आहे. एवढेच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी मला शिकवले. सर्व आपली माणसे सभेत आहेत. ते आपल्या प्रेमापोटी येतात. काही सभा मी पाहिल्या. राष्ट्रवादीचे लोक काही सभेत पाठवले जातात. आमची गर्दी तशी नाही. विरोधकांच्या शब्दकोशात फक्त खोके हेच शब्द आहेत.

May be an image of 4 people, people standing, flower and text that says "ता. नेवासा"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर आजच्या या विराट सभेनं दिलं आहे. आजच्या सभेला सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मला शिवकवण दिलीय की जे होणार आहे तेच बोलायचं. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो. एकदा शब्द दिला की मी स्वतःचही ऐकत नाही. लोक विरोधातून सत्तेकडे जातात. परंतु, आम्ही सत्तेकडून विरोधात गेलो.  त्यावेळी अनेकजण आमचा कार्यक्रम करण्याच्या तयारीत होते. परंतु, 50 जण सोबत असलेले सगळे विश्वासू होते. त्यामुळे आम्ही यशस्वी झालो. आमचा निर्णय हा जगातील एक मोठा इतिहास आहे. अडीच वर्षांचा वनवास भोगला. परंतु, आता सगळे आमदार हा वनवास संपला असे म्हणत आहेत. अडीच वर्षे समाजात नकारात्मकता पसली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस आणि मी ठरवून निर्णय घेतला आणि जनतेच्या मानातील सरकार स्थापन केलं. आज जनतेमध्ये उत्साह आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.  

May be an image of 4 people and people standing

पैठण येथील सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप आमच्यावर करण्यात आला होता. मात्र ही गर्दी पैसे देऊ नाही तर प्रेमापोटी जमली असल्याचे यावेळी स्पष्ट केले. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर हिंदू सणांवरील संकट दूर करून हे सण उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याची तरतूद केली. काही जणांनी राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचे सांगितले, मात्र गेल्या अडीच वर्षात एक सत्ताधारी आणि एक सत्ताबाह्य अशा दोन मुख्यमंत्र्यांची त्यांना सवय झाली होती ही सोय गैरसोयीत बदलल्यामुळेच आलेल्या नैराश्यातून ही टीका होत असल्याचे यासमयी स्पष्ट केले.

पैठण शहराच्या विकासासाठी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करू, संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी सरकारी निधी उपलब्ध करून देऊ, पैठणमध्ये पैठणी साडीचे क्लस्टर उभारण्यासाठी निधी देऊ, पैठण शहरात संतपीठ तयार करण्यासाठी २० कोटींची तरतूद करू, शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून निधीची तरतूद करू, तसेच मराठवाडा वॉटरग्रीडसाठी १००० कोटींचा निधीची तरतूद केल्याचेही याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित पैठणकरांना संबोधित करताना जाहीर केले.