निराला बाजार परिसरातील चार ते पाच कार्यालयांची लॉक तोडून सुमारे एक लाख १० हजारांचा ऐवज चोरणाऱ्याच्‍या मुसक्या आवळल्या

औरंगाबाद,११ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- निराला बाजार परिसरातील एमपी लॉ सोसायटीतील क्रांतीचौक पोलिसांनी शनिवारी दि.१० रात्री मुसक्या आवळल्या. ईश्र्वर महादेव गावडा (३०, रा. सेव्‍हन हिल पुलाजवळ) असे आरोपीचे नाव असून त्‍याला १३ सप्‍टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एल. रामटेके यांनी रविवारी दिले.

या प्रकरणात आयुष अंकलेष गंगवाल (२८, रा. पन्‍नालालनगर) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीचे वडील आर्किटेक असून त्‍यांचे कार्यालय निराला बाजार परिसरातील एमपी लॉ परिसरातील सोसायटीत आहे. २ सप्‍टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्‍या सुमारास कामकाज संपल्याने कर्मचाऱ्यानी कार्यालयाला लॉक लावून निघून गेले. संधी साधत चोरट्याने फिर्यादीच्‍या वडीलांच्‍या कार्यालयासह शेजारील चार ते पाच कार्यालयांचे लॉक तोडून एक लाख १० हजार रुपचये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. त्‍यात गंगावाल यांच्‍या कार्यालयातून १५०० रुपयांची चांदीचे शिक्के, ७५ हजारांचा एलईडी व १५०० रुपयांचे कम्प्युटिंगचे पाच युनीट, सावन चुडीवाल यांच्‍या कार्यालयातून दोन हजार रुपये रोख, स्‍वप्नील उपाध्‍याय यांच्‍या कार्यालायतील १५०० रुपयांची हार्डडिस्‍क आणि डॉ. उमेश मुंदडा यांच्‍या कार्यालयातून चार हजार रुपयांचे दोन पोर्टेबल सीसीटीव्‍ही असा सुमारे एक लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

तपासादरम्यान सीसी‍टीव्‍हीच्‍या चित्रणाव्‍दारे पोलिसांनी आरोपी ईश्र्वर गावडा याला बेड्या ठोकल्या. त्‍याने चोरलेला ऐवज रविवारच्‍या बाजारात विक्री केल्याची कबुली दिली. त्‍याला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी आरोपीकडून गुन्‍ह्यातील एवेज हस्‍तगत करायचा आहे. आरोपीचे कोणी साथीदार आहेत काय, आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.