पत्राचाळ घोटाळाप्रकरणी राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा मुक्काम आणखी वाढला आहे. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढली आहे. मागील ५० दिवसांपासून तुरुंगात आहेत.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची आज न्यायालयाने दखल घेतली. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असे संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले. कोर्टाच्या आदेशानंतर आज ही प्रत देऊ असे ईडीने सांगितले. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करत असल्याचे कोर्टाने म्हटले.