वैजापूर न्यायालयात सर्पदंशाने एकाचा मृत्यू

वैजापूर,९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- सर्पदंशाने एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास वैजापूर न्यायालयाच्या आवारात घडली. भगवान एकनाथ कराडे (वय 45 वर्ष, रा. शिरेगांव,ता.गंगापूर) असे मृताचे नाव आहे.भगवान कराडे हे न्यायालयीन कामासाठी गुरुवारी सकाळी वैजापूर येथील न्यायालयात आले होते.दुपारी साडेबाराच्या सुमारास ते न्यायालयाच्या आवारात उभे असतांना त्यांना सर्पदंश झाला. तातडीने त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत झाला. या प्रकरणी वैजापूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.