वैजापूर येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त शिव-उमा बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध कार्यक्रम

देशभरात साक्षरता प्रमाण वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज – धोंडिरामसिंह राजपूत

वैजापूर,९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- आजही देशात निरक्षरतेचे प्रमाण मोठ्याप्रमाणात असून हे प्रमाण महिला वर्गात जास्त आहे. देशात तळागाळातील घटक, वाडी वस्तीवर राहणारे नागरिक, आदिवासी जनजातीमध्ये शिक्षणाबाबत  उदासीनता आहे. या सर्व बाबींचा विचार करता सम्पूर्ण साक्षरतेसठी देशभर सर्वंकष प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. असे प्रतिपसं धोंडिरामसिंह राजपूत यांनी  शहरातील विद्यानगर येथे गुरुवारी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

ऊस तोड कामगार,पालावर जीवन जगणारे, भटके विमुक्त लोक व त्यांची मुले अजूनही शिक्षणापासून कोसो दूर आहेत. महिलांना व्यवहारिकता यावी, त्यांना बँक व्यवहार कळावे, त्या उद्यमशील बनाव्या, आपल्या मुलाबाळांवर योग्य व सूसंस्कार करावे व त्यांना आर्थिक साक्षरता समजावी यासाठी राष्ट्र व राज्य पातळीवर सर्वंकष प्रयत्न व्हावे असेही राजपूत पुढे म्हणाले.गणेशोत्सव व आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त साक्षरता व त्याचे जीवनातील महत्व तसेच नृत्य स्पर्धा असे विविध कार्यक्रम येथील शिव- उमा बहुउदेशीय सेवाभावी विकास संस्था वैजापूर या संस्थेतर्फे  आयोजित करण्यात आले होते. नृत्य स्पर्धेत डवाळायेथील कु. स्वाती बहिरट हिने महाराष्ट्र लोककला नृत्य अंतर्गत लावणी सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. तिला केंद्रीय सांस्कृतिक मंत्राल्याकडून दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत रविदास मागासवर्गीय वसतिगृहाचे संचालक अण्णा साहेब ठेंगडे होते. संस्थेचे अध्यक्ष अशोक गोपीनाथ मांजरे,    सचिव योगेश मांजरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, सुधीर जोशी, पदमा टेके, शीला संत, श्रीमती जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.