वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बैठक

वैजापूर,५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सोमवारी वैजापूर येथे पार पडली. 


मार्केट कमिटीच्या सेल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील, समता परिषदेचे मनोज घोडके, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके, एल.एम. पवार, समता परिषदेचे काशिनाथ गायकवाड, बाजार समितीचे माजी सभापती प्रतापराव धोर्डे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनकरराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, अजय पाटील चिकटगांवकर, प्रशांत शिंदे, राजेंद्र मगर, मंजाहरी गाढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.