औरंगाबाद तालुक्यात दरकवाडी येथे दोन मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यू

औरंगाबाद,५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- औरंगाबाद तालुक्यात दरकवाडी येथे दोन मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली.

औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा पासुन जवळ असलेले दरकवाडी येथे आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अजय धनंजय वाघ वय वर्षे अंदाजे ११ दुसरा भाऊ पार्थव धनंजय वाघ वय वर्षे अंदाजे ९ हे शेतातील शेततलावर गेले असता एक जण शेततलावात बुडायला लागला तेव्हा दुसरा भाऊ त्याला वाचायला गेला तो पण पाण्यात बुडाला आहे. शेत गावापासून १०० फुटावर असुन त्या दोघांचे मृत्यूदेह पाण्यातुन बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पोस्ट मार्टम केले नसल्याची माहिती मिळाली आहे