कुटुंबाला तब्बल १३ लाख ५० हजारांचा गंडा,ट्रॅव्हल्स मालकाची रवानगी हर्सूल जेलला 

औरंगाबाद,१८जून /प्रतिनिधी :- हज यात्रेच्‍या नावाखाली कुटुंबाला तब्बल १३ लाख ५० हजारांचा गंडा घातल्या प्रकरणी अल बशीर टुर्स अॅण्‍ड ट्रॅव्‍हल्सच्‍या मालक त‍था आरोपी अब्बास अली वाहीद अली हाश्‍मी (३८, रा. चांदमारी, नंदनवन कॉलनी) याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायादंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी शुक्रवारी दि.१८ दिले.

या प्रकरणात सय्यद जमालोद्दीन गफ्फार सय्यद अब्दुल गफ्फार (३१, रा. पंढरपुर एमआयडीसी वाळूज) यांनी फिर्याद दिली.२०१७ मध्‍ये फिर्यादी, त्‍यांचे आई-वडील आणि भावाचे हजर यात्रेला जाण्‍याचे ठरले होते. मात्र त्‍यांचा हजर कमिटी मार्फत नंबर लागला नाही. त्‍यावेळी फिर्यादीचा मीत्र अब्दुल हाजी याने पैठण गेट येथील अलबशीर टुर्स या ट्रॅव्‍हल्सचा मालक अब्बास अली हा हज यात्रेला घेवून जातो असे सांगितले. त्‍यानूसार फिर्यादीने अब्बास अलीची भेट घेवून हज साठी लागणारी सर्व कागदपत्र दिली व प्रत्‍येकी दोन लाख ७० हजार देण्‍याचे ठरले. त्‍यानूसार फिर्यादीने आरोपीच्‍या बँक खात्‍यात पाच लाख १० हजार रुपये ट्रान्‍सफर केले, तसेच तीन लाख रुपये आरोपीच्‍या ऑफीसला नेवून दिले. फिर्यादीच्‍या ओळखीचे जफर पठाण याने देखील हज यात्रेसाठी आरोपीला पाच लाख ४० हजार रुपये दिले. तसेच आरोपीच्‍या इतर नातेवाईकांनी देखील हजयात्रेसाठी आरोपीला पैसे दिले होते. मात्र आरोपीने त्‍यांना हजला न नेता त्‍यांची फसवणूक केली.या प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यता आला.