लासूरगाव व बाभूळतेल सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ.बोरणारे यांच्याकडून सत्कार

वैजापूर,​३​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापुर-गंगापूर मतदारसंघांतील लासूरगाव व बाभुळतेल गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर प्रथमच सर्व संचालक व ग्रामस्थांनी शुक्रवारी आमदार बोरणारे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली.

यावेळी मतदारसंघाच्यावतीने आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी लासूरगाव या सेवा सहकारी संस्थेवर चेअरमनपदी रितेश शेठ मुनोत व व्हाईस चेअरमनपदी सुखदेव पाटील आगवणे व बाभुळतेल या सेवा सहकारी संस्थेवर चेअरमनपदी निवृत्ती पाटील वीर व व्हाईस चेअरमनपदी कारभारी पाटील जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्यासह दोन्ही गावातील सर्व संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले. 
याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामहरी बापू जाधव, उपतालुकाप्रमुख पी. एस. कदम, महेश पाटील बुनगे, सरपंच आनिल कुळधर, उपसरपंच सुरेश काटे, संचालक वसंतराव हुमे, राजेंद्र संगेकर, घनश्याम हरिचंद्रे, साहेबराव गडकर, लताबाई देशमुख,  करुणाबाई नेटके, चांगदेव धुडाट, आप्पा कदम, कडु पाटील शेजुळ, कैलास पाटील कदम, संजूभाऊ म्हस्के, अशोक दारवंटे, आनिल दारवंटे, सुधाकर होले, संभाजी साळुंके, गोरखनाथ जाधव, संदीप कुंदे, गोविंद वाघ, दिनकर दारवंटे, मंदाबाई दारवंटे,  संगीता चव्हाण, दत्तु पवार, राजू पाटील श्रीखंडे, अशोक आगवणे, शांताराम हरिचंद्रे, बबनकाका हरिचंद्रे, विनायक नळे, बाबुराव श्रीखंडे, तुकाराम दारवंटे, संतोष दारवंटे, नानासाहेब महाले, विलास भोपळे, राजू वाघ, कपिल वाघ यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.