औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपती येथे गणपती अर्थर्वशीर्ष पठण

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा १७ वर्षांपासून पुढाकार

औरंगाबाद,​३​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपती राजबाजार हा मानाचा गणपती ओळखला जातो. गेल्या १७ वर्षांपासून येथे नित्यनेमाने दररोज सकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत गणपती अर्थर्वशीर्ष पठण करण्यात येते.

May be an image of 5 people and people standing

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडतो.यावेळी संस्थान गणपती विश्वस्त मंडळ सहकार्य करते.  स्वर्गीय पवन खैरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.