राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त वैजापूर बाजार समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण

वैजापूर ,१० जून  /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी सुरुवातीलाच मुख्य हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि लोकनेते शरदचंद्र पवार यांनी उभ्या आयुष्यात केलेल्या कामाची माहिती वर्धापनदिननिमित्त प्रसंगी सभापती भागिनाथ दादा मगर, तालुकाअध्यक्ष आडवोकेट प्रतापराव निंबाळकर, युवानेते अजय पाटील चिकटगावकर,प्रशांत शिंदे,अॅड प्रदीप चंदने यांनी दिली.यावेळी कार्यक्रमाला माजी तालुकाध्यक्ष दत्तू पाटील वाकलेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिनकर बापू पवार, उपसभापती प्रभाकर बापू बारसे, उपसभापती मंजाहारी पाटील गाढे, बाजार समिती संचालक साईनाथ अण्णा मतसागर, माजी विधानसभा अध्यक्ष गणेश दादा चव्हाण, अदुशेट बागवान, शहराध्यक्ष प्रेम भाऊ राजपूत, कार्याध्यक्ष सागर भाऊ गायकवाड, शहर कार्याध्यक्ष लखन त्रिभुवन, सरचिटणीस सम्राट राजपूत, निलेश बाविस्कर, विरगाव सरपंच दादासाहेब बारसे, सतीश तागड, राधाकृष्ण खवले आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.