वैजापूर येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.कराड यांच्या उपस्थितीत बूथ सशक्तीकरण अभियान बैठक

वैजापूर,​१ सप्टेंबर​  /प्रतिनिधी :-भारतीय जनता पार्टीच्या वैजापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी  यांची ‘बुथ सशक्तिकरण अभियान’ या संदर्भात महत्वपूर्ण बैठक केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड  यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी येथे झाली. 

Image

भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होऊन बूथ सशक्तीकरण अभियान संदर्भात आढावा घेण्यात आला. या बैठकीस भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, औरंगाबादचे माजी महापौर बापू घडामोडे ,जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप, सहकार आघाडीचे कैलास पवार, सतीश शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, अनिल वाणी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.