सिध्दापूरवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 22 लक्ष 36 हजार निधीच्या कामाचे भूमीपूजन

वैजापूर,५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघासाठी पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने 30 कोटी 30 लाख 41 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधींपैकी तालुक्यातील सिध्दापुरवाडी येथे 22 लाख 36 हजार रुपये निधीच्या कामांचे भूमीपूजन पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे यांच्याहस्ते रविवारी झाले.

आमदार रमेश पाटील बोरणारे यांची  प्रमुख उपस्थिती होती. पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, कल्याण पाटील जगताप, विभागप्रमुख नानासाहेब पाटील थोरात, सुनिल कारभार, कनिष्ठ अभियंता कीर्तने, यादव, सरपंच नंदू पाटील हारदे, उपसरपंच अमोल तागड, रामभाऊ पाटील बारसे, भगवान गायकवाड, गणेश पाटील सावंत, कोंडीराम पाटील सोमवंशी, काशिनाथ पाटील सोमवंशी, चेअरमन विजय पाटील हारदे, लाडू दादा हारदे, कैलास हारदे, आण्णासाहेब हारदे, सुरेश हारदे, अभिजीत हारदे, तुषार हारदे, अशोक हारदे, ताहेरभाई शेख, किशोर हारदे, बाबासाहेब हारदे, किरण हारदे, आकाश हारदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.