वैजापूर व्यापारी असोसिएशनचे काशिनाथ गायकवाड यांची मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स च्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

वैजापूर,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व वैजापूर शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी, गणेश महासंघ अध्यक्ष काशीनाथ गायकवाड यांची मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेंड अँड कॉमर्सच्या प्रदेश उपाध्यक्षपदी  बुधवारी (ता.24) निवड झाली. अध्यक्षपदी आदेशपालसिंह छाबडा तर महासचिवपदी जगन्नाथ काळे यांची निवड करण्यात आली.

काशीनाथ गायकवाड यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, काँग्रेसचे नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे,माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, व्यापारी संघाचे प्रकाश बोथरा, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत, वसंत क्लबचे सचिव जफर ए.खान, प्रकाश वर्मा, जिल्हा दूध संघाचे रहीम खान आदींनी अभिनंदन केले आहे.

मराठवाड्यातील व्यापारी बांधवांच्या अडीअडचणी  जाणून घेऊन त्या शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असल्याचे  काशीनाथ गायकवाड म्हणाले. मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेंड अँड कॉमर्सचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी मराठवाड्यातील व्यापारी बांधवांच्या पाठीशी असून  त्यांच्या समस्या निश्चितपणे सोडविण्याचा प्रयत्न करु. असे श्री.गायकवाड म्हणाले.मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. गायकवाड यांचा शहरातील व्यापाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी व्यापारी संघाचे विनोद गायकवाड, वैजापूर किराणा असोसिएशनचे प्रकाश बोथरा, गणेश अनर्थे, सिद्धेश गायकवाड व पी,एम,ठाकूर उपस्थित होते.