वैजापुरात हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

वैजापूर,१७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरात हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. हैदराबाद मुक्ती संग्राम लढयातील हुतात्मा जगन्नाथ भालेराव यांच्या स्मरणार्थ असलेल्या हुतात्मास्मारकातील स्मृतीस्तंभाला स्वातंत्र्य सैनिक स्व. गणपतराव लोंढे यांच्या पत्नी श्रीमती कमलाबाई गणपतराव लोंढे यांच्याहस्ते ध्वजवंदन करून अभिवादन करण्यात आले.

मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्याहस्ते सकाळी नऊ वाजता झाला. नगरपालिकेत नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी तर तहसील कार्यालयात तहसीलदार राहुल गायकवाड, पंचायत समिती कार्यालयात प्रभारी गट विकास अधिकारी एच.आर. बोयनर तर विविध शासकीय कार्यालयात कार्यालय प्रमुखांनी ध्वजवंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांनी करून हैदराबाद मुक्ती संग्राम लढयाची माहिती दिली.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरखान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, नगरसेवक गणेश खैरे, सखाहरी बर्डे, स्वप्नील जेजुरकर, डॉ. प्रीती भोपळे, दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, मुख्याधिकारी भागवत बिघोत, नायब तहसीलदार रामेश्वर महाजन, महेंद्र गिरगे, डॉ. व्ही.जी. शिंदे, अशोक पवार, समीर लोंढे, मोती हिवाळे, प्रमोद निकाळे, रमेश त्रिंभुवन, श्री. चिमटे, महादेव चांदगुडे, विष्णू आलूले,  सहायक गटविकास अधिकारी अमेय पवार, महेश शिंदे पाटील, दीपक त्रिभुवन, श्री. कहाटे, ययांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते नागरिक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

या निमीत्ताने नगर पालिकेच्यावतीने हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात यंग इंडिया अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सेंट मोनिका इंग्लिश शाळेचे छात्र यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन स्वछता केली,तसेच नारंगी धरणावर जाऊन त्याही ठिकाणी स्वछता अभियान राबविण्यात आले.