वैजापूरात इफ्तार पार्टीत सर्वधर्म समभावचे दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यातर्फे इफ्तार पार्टी

वैजापूर,२९ एप्रिल  /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यातर्फे वैजापूर शहरातील मुस्लीम बांधवांसाठी शुक्रवारी इफ्तार पार्टी देण्यात आली.शहरातील जामा मस्जिद परिसरात आयोजित या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

या इफ्तार पार्टीत शहर व तालुक्यातील सर्व जाती- धर्म व संप्रदायाचे नागरिकांनी उपस्थित राहून सामाजिक सौहार्द घडवीत एकता, बंधुत्व व सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. जामा मस्जिदचे इमाम यांनी धर्म वचन सादर केल्या नंतर उपस्थित सर्वांनी इफ्तार पार्टीचा आनंद घेतला.

या प्रसंगी माजी आमदार सुभाष झाबड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी,माजी नगराध्यक्ष साबेर खान, बाळासाहेब संचेती, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, राजूसिंह राजपूत, माजी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी, हाजी अकील सेठ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  प्रशांत पाटील सदाफळ, शहराध्यक्ष काझी मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, डॉ. अमोल अन्नदाते, जितेंद्र चापानेरकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सोपानराव निकम, बाजार समितीचे उपसभापती विष्णू जेजुरकर, डॉ.निलेश भाटिया, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत.कल्याण पाटील जगताप, भाजपचे डॉ.राजीव डोंगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत, प्रशांत शिंदे, ज्ञानेश्वर सिरसाट, साईनाथ मतसागर, मंजाहरी गाढे, दीपक राजपूत,काझी हाफिजोद्दीन, सय्यद हिकमत, अल्ताफ बाबा, काझी लईक इनामदार यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.