भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी वैजापूर भाजपची केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड यांच्या उपस्थितीत बैठक

वैजापूर ,१ जानेवारी  / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या 2 जानेवारी 2023 रोजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ, औरंगाबाद येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या नियोजनासंदर्भात व पूर्वतयारीसाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.31) येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

या बैठकीस भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, संजय खंबायते, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दागोंडे, जिल्हा चिटणीस मोहनराव आहेर, कैलास पवार, ज्ञानेश्वर पाटील जगताप, सुनील  पैठणपगारे, दशरथ बनकर, प्रशांत कंगले, नबी पटेल मजीद कुरेशी, राजूसिंग राजपूत, शहराध्यक्ष दिनेश  राजपूत, सुरेश राऊत, सतीश पाटील शिंदे, कारभारी पाटील कराळे,  अनिल पाटील वाणी, नाना गुंजाळ, संतोष मिसाळ, प्रताप महेर, शिवनाथ पाटील तुपे, चंद्रशेखर साळुंखे, उदय सोनवणे, सुदाम दादा भडके, अशोक शेळके, गणेश खैरे, प्रेमसिंग राजपूत, शैलेश पोंदे, गोकुळ भुजबळ, महेश भालेराव, नारायणराव कवडे, मेजर गौतम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, प्रदीप चव्हाण, गौरव दोडे, सुनील गायकवाड, ज्ञानेश्वर शिरसाठ, दादाभाऊ मगर, शांताराम दुशिंग, केतन आव्हाळे, ज्ञानेश्वर आदमाने, कल्पना हंगे, राजू देशमुख, संतोष आवारे, अवधूत ठोंबरे, सचिन घोडके, अमोल जाधव, मनोज मुळे, ऋषिकेश सातपुते, संदेश जाधव, आकाश बागुल, सुरेश निकम यांच्यासह शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी व बुथ अध्यक्ष हजर होते.