वैजापूर तालुक्यात महावितरणचे आजपासून वीज देयके दुरुस्ती शिबीर

वैजापूर ,१० मार्च / प्रतिनिधी :- कृषी वर्गवारीतील ग्राहकांच्या वीज देयकांबाबत असणाऱ्या शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे आजपासून (ता.10) तालुक्यात वीज देयके दुरूस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
31 मार्चपर्यंत चालणाऱ्या या शिबिराच्या कालावधीत ग्राहकांचा मंजूर वीजभार,मीटर वाचन,थकबाकी या स्वरूपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. कृषी ग्राहकांच्या वीजदेयक दुरुस्ती व मंजुरीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करून देयक दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येणार आहे.महावितरणची कृषी ग्राहकांकडे सप्टेंबर 2020 पर्यंत मोठी थकबाकी असून चालू वीज देयकाच्या थकबाकीतही मोठी वाढ झाली आहे.कृषी ग्राहकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वीज वितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.