राज ठाकरे यांची तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार, पण ‘या’ असणार अटी

महाराष्ट्रात कुणीच नाही ‘योगी’, आहेत ते सत्तेचे ‘भोगी’

औरंगाबाद ,२८ एप्रिल  /प्रतिनिधी :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाकरी तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी देण्यात आलीय. पोलिसांनी त्यांच्या सभेला सशर्त परवानगी दिलीय. त्यामुळे राज ठाकरेंची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. 

औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी मिळणार मिळाल्याने राज ठाकरे यांच्या या सभेची उत्सूकता राज्याच्या जनतेमध्ये आहे. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 1 मे रोजी ही जाहीर सभा होणार आहे. पण राज ठाकरेंच्या सभेसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

या सभेला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 16 अटी लागू घाला आहेत. पोलिसांनी या सभेला परवानगी दिल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, पोलिसांनी घातलेल्या अटी व शर्तीचे निश्चितपणे पालन केले जाणार आहे. 

सभेला फक्त 15 हजार लोकच जमू शकतील        

या आहेत अटी शर्ती

– जाहीर सभा दिनांक ०१/०५/२०२२ रोजी 4.30 ते 9.45 या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.

–  सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी सभेला येतांना आणि परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. 

– सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा आणि मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहरा बाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावं. सभेला आलेल्या नागरीकांनी दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन पाकींगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सुचना द्याव्यात. 

– सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असुन आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरून परत जाण्याच्या वेळी कोणतीही रैली काढु नये.

– कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये. पदार्थ बाळगू नये अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अट क्र. २,३,४ बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरीकांना कळविण्याची जवाबदारी संयोजकांची राहील.

–   कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरुन निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर/ गावांना अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या हो माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचौक यांचे कडे द्यावी.

– सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा १५००० इतकी असल्यामुळे त्याठिकाणी १५००० पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल. 

– सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशीत केलेल्या ठिकाणी मजबुत बॅरीकेटस उभारावं, सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलीसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

– सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही अगर त्याविरूध्द चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी. सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण व नियमन) नियम २००० नुसार परिशिष्ट नियम ३ (१), ४ (१) अन्वये. आवाजाची मर्यादा असावी. वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये ५ वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु.१,००,०००/- ( एक लाख फक्त) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते. 

– सदर कार्यक्रमा दरम्यान कुटल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवटा, पाणीपुरवटा, दळव-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

– सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालयाकडून काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.

–  सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुषासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी. 

–  सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.

– सदर कार्यक्रमा दरम्यान मिटाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिटाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी

यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी केले योगींचे कौतुक

मुंबई,२८ एप्रिल  /प्रतिनिधी :- महाराष्ट्रासह देशभरात भोंग्याचे राजकारण सुरू असून राज्याच्या राजकारणामध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना” असे म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तर राज्याबाहेरही अनेक हिंदू संघटना यावरून आक्रमक झाल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी सुमारे ११ हजार लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. तर, ३५ हजार २२१ ठिकाणी आवाजाच्या मर्यादेतच लाऊडस्पीकर वाजविण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत बुधवारपर्यंत राज्यातील विविध प्रार्थनास्थळाहून तब्बल १० हजार ९२३ लाऊडस्पीकर काढून घेतले आहेत. एका परिसरातून बाहेर जावा, एवढा आवाज लाऊडस्पीकरमध्ये नसावा, लोकांना या ध्वनीक्षेपकाचा कुठलाही त्रास होता कामा नये, असे योगींनी म्हटले होते.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनिश कुमार अवस्थी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्यातील विविध प्रार्थनास्थळावरील नियमबाह्य लाऊडस्पीकर हटविण्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठीचा आदेश २५ एप्रिल रोजी काढण्यात आला असून ३० एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करण्याचेही या आदेशात म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमधील मंदिरांपासून ते अगदी लखनऊमधील शिया मशिदींपर्यंत सर्वांनीच यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मथुरेमधील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराने रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन म्हटली जाणारी मंगल चरण आरती भोंग्यावर न वाजवण्याचा निर्णय घेतला. भागवत भवन येते श्री कृष्ण जन्मभूमीच्या आवारामध्ये रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन एक तास आरती ऐकवली जायची. अशाच प्रकारे अयोध्येसहीत इतर शहरांमधून प्रतिसाद मिळत असून अनेकांनी स्वइच्छेने आवाजावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनऊमधील इदगाहचे इमाम असणाऱ्या मौलाना खलिद रशिद फिरंगी महाली यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सर्व सुन्नी मशिदींना भोंग्यांचे आवाज कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. “आम्ही सर्व मशिदींमधील भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले असून आवाज मशिदीबाहेर येणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे,” असे इमाम म्हणाले.

दरम्यान, मशिदी किंवा मंदिरांवरील परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केली आहे. कोर्टानं परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही, असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्रार्थनास्थळांवरील भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यातही, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वांचे एकमत झाले आहे.