औरंगाबाद स्मार्ट सिटी योजनेअंतंर्गत माजी सैनिकांची आज पदभरती

औरंगाबाद,२४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-औरंगाबाद स्मार्ट सिटी जड वाहन वाहतूक परवाना धारक अनुभवी 20 माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर कम कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेणार आहे. सदर निवड प्रक्रिया 25 ऑगस्ट 2022 राजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी,औरंगाबाद  येथे राबवली जाणार आहे. पात्रता धारक माजी सैनिक उमेदवारांनी उपरोक्त वेळेस, आवश्यक कागदपत्रांसह (डिस्चार्ज बुकची कॉपी, आर्मी व सिविल हेवी व्हेहिकल ड्रायव्हिंग लायसन्स, आर्मी ग्रॅजूएशन सर्टीफीकेट इत्यादी) सह हजर रहावे.

Aurangabad Smart City Bus | Aurangabad to Jalna Journey - YouTube

            ट्रेड:सैन्य दलातील ट्रेड DSV@Spl/AM-50/Dvr/Dvr(MT)/ DMT/DvrGnr/ Dvr(AFT) यापैकी असावा. शैक्ष्ज्ञणिक अहर्ता :- 10 वी, 12 वी पास आणि आर्मी ग्रॅजुएट.वैध प्रवासी बस वाहतूक परवाना PVS BUS (TRV-Bus) धारकास प्राधान्य. निवडक उमेदवारांनी  MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडीच्या, नियुक्तीच्या तारखेपासून एक माहिन्याच्या आत तयार करावा. सैन्य दलात हेवी व्हेहिकल ड्रायव्हिंगचा किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्यक. मेडीकल कॅटेगिरी SHAPE-1. वय- अधिकतम 48 वर्ष असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, 41, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद या पत्त्यावर, तसेच 0240-2370313 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा.जाहिरात केवळ माजी सैनिकांकरिता प्रसिद्ध केली आहे. निवड प्रक्रियेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रत्यक्ष सहभागी नाही.