बेलगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध

वैजापूर,२४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील बेलगाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली. 

सोसायटीच्या या निवडणुकीत प्रशांत दादासाहेब सदाफळ, अशोक जगन्नाथ गडाख, फकीरा अर्जुन त्रिभुवन, केशव गोपीनाथ निमसे, संतोष पोपट साबळे, किरण उत्तमराव गायकवाड, करीम कासम शाह, दिनकर रघुनाथ मतसागर, पांडुरंग मनाजी पगारे, सुनीता ज्ञानेश्वर जगताप, अनिल धोंडीराम सोनवणे, सुनंदा अनिल धीवर व इंदुबाई विजय गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, पंकज ठोंबरे,  बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, डॉ.राजीव डोंगरे, मोहनराव साळुंके यांनी अभिनंदन केले आहे.