गणेशउत्सव:मंडप व ध्वनी प्रदुषण नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत समितीची स्थापना

औरंगाबाद,२४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- गणेशउत्सावाचे निमित्ताने मंडप व ध्वनी प्रदुषण नियमांच्या अंमजबजावणीसाठी मा.मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार तहसिलदार औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी पथक निुयक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्व वार्ड अधिकारी सहाय्यक असतील तर महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी व वार्ड अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांची समिती सर्व गणेश मंडळाची तपासणी करून दोन दिवसात अहवाल सादर करेल तसेच याबाबत छायाचित्रण करण्यात येईल.

अ.क्र.नावेपदनाम
1.श्री.विजय चव्हाणअपर तहसिलदार औरंगाबाद(मो.नं. 9049989614)
2.श्रीमती. ज्योती पवारतहसिलदार औरंगाबाद (ग्रामीण)(मो.नं. 7722097000)
3.श्री.उत्तम बहुरेनायब तहसिलदार (उ.वि.अ.औरंगाबाद)(मो.नं. 9049427897)
4.श्रीमती. अपर्णा थेटेमालमत्ता अधिकारी, महानगरपालिका, औरंगाबाद(मो.नं. 9096549990)
5.श्री.संजय सुरडकरवार्ड क्रमांक 1
6.श्री.प्रकाश आठवलेवार्ड क्रमांक 2 (मो.नं. 9764999789)
7.श्री.अशोक गिरीवार्ड क्रमांक 3 (मो.नं. 8308822652)
8.श्री.विक्रम दराडेवार्ड क्रमांक 4 (मो.नं. 8329497096)
9.श्रीमती.सविता सोनवणेवार्ड क्रमांक 5 (मो.नं. 9370665021)
10.श्री.श्रीधर टारपेवार्ड क्रमांक 6 (मो.नं. 7588644670)
11.श्री.कमलाकर ज्ञातेवार्ड क्रमांक 7 (मो.नं. 9764999790)
12श्री.संतोष ठेंगळेवार्ड क्रमांक 8
13.श्री.असदउल्ला खानवार्ड क्रमांक 9 (मो.नं. 9764999785)

            समारंभाच्या व उत्सवाच्या प्रसंगी रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या मंडपा संदर्भात व ध्वनी प्रदुषण (नियम व नियम) नियम 2000 ची अंमजबजावणी करण्यासंबंधीचे निर्देश देण्यात आले. नियुक्त केलेल्या पथकांनी वेळोवेळी माहिती वार्ड अधिकारी यांनी वेळेत देण्यासाठी महानगरपालिका स्तरावर आढावा घेण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. मंडपांना परवानगी देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सर्व प्रभाग अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी, सवच्छता निरीक्षक यांच्या सेवा या कामी द्याव्यात. मालमत्ता अधिकारी महानगरपालिका औरंगाबाद यांनी मंडळाना द्यायवयाचा अर्ज व माहिती पुस्तिका तात्काळ तयार करून सर्व मंडळांना देण्याची व्यवस्था करावी.

            उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार कार्यवाही झालेली नसल्यास संबंधित वार्ड अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करुन घ्यावी व तसा अहवाल छायाचित्रासह या कार्यालयास सादर करावा. असे उपविभागीय दंडधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.