जालन्यात कोरोना आता थेट कारागृहातही,नऊ कैदी अँटीजेन चाचणीत बाधित

जिल्ह्यात 68 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना: कोरोनाचा संसर्ग जालन्यात  सगळीकडेच पसरत चालल्याचे दिसून येत आहे. वर्दळीच्या ठिकाणांहून कोरोना आता थेट कारागृहातही पोहोचला आहे. येथील जिल्हा कारागृहातील नऊ कैदी अँटीजेन चाचणीत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, त्यांना रुग्णालयात असलेल्या 55 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. हा वार्ड कैद्यांसाठी राखीव ठेवण्यात आला असून तिथे 24 तास कडक पहारा देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार 31 जुलै आणि एक 1 ऑगस्ट रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 215 कैद्यांची आणि 40 अधिकारी-कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टमध्ये हे 9 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.दरम्यान,कारागृहातील कैद्यांच्या वारंवार तपासण्या करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक अरुणा मुकुटराव यांनी दिली आहे. 

जालना शहरातील एकुण 68 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7649 असुन सध्या रुग्णालयात -471 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2952, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-146 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-14137एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 68 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -2445 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-11441, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-441 एकुण प्रलंबित नमुने-162, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2428.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -56, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-2478, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-466,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-33, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -471,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-58,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-30, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1597, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-773 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-26667 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-75 एवढी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *