जालना भूमी अभिलेख कार्यालयातील दलालीचे काम करणाऱ्याला लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

जालना ,२० जानेवारी /प्रतिनिधी :- जालन्यातील भूमी अभिलेख कार्यालय दलालाच्या विळख्यात सापडलेले आहे.शेत जमिनीच्या मोजणी अहवाल देण्यासाठी  तीन लाख रुपयांची लाच मागणी करून त्यातील पहिला हप्ता रोख रक्कम एक लाख रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दलालीचे काम करणाऱ्या अशोक पिंपळे (रा.पीर पिंपळगाव ता.जालना) याला लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. 

गोलापांगरी येथील एका शेतकऱ्याच्या जमीनीचे न्यायालयात वाटणीच्या प्रकरणात जमीन मोजणीचा अहवाल न्यायालयात दाखल करण्यासाठी संबंधित शेतकरी सातत्याने भूमी अभिलेख कार्यालयात चकरा मारत होता तेथील संबंधित अधिकारी त्याला दाद देत नव्हते त्यातच या कार्यालयात दलाली करण्याऱ्या पिंपळे याने आपण काम करून देतो असे सांगितले व लाच मागितली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीआर कार्ड ,टोच नकाशा, जमिन नकाशा या सगळ्या कामासाठी दलाली चे दर ठरलेले आहेत संबंधित अधिकारी कधीच जागेवर बसत नाहीत जालन्यातील सर्वे नंबर 270 मधील वळण रस्त्यासाठी शासनाने संपादन केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर खाजगी मालकांच्या नोंदी आहेत त्यावरून सरकारच्या जमिनी खाजगी मालकांच्या नावाने असल्याचे दाखवून भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याचे अधिकृत नकाशे दिले आहेत. जिल्हाधिकारी डाॅ विजय राठोड यांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे.