वैजापूर तालुक्यातील 75 हजार 726 शेतकऱ्यांना वाटपासाठी 51 कोटी 39 लाख रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये जमा
जफर ए.खान
वैजापूर,६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी वैजापूर तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या निधीतून 134 गावांतील 25 हजार 726 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी 51 कोटी 39 लाख 37 हजार 496 रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये महसूल विभागातर्फे वर्ग करण्यात आले आहेत.सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही रक्कम जमा होणार आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात अतिपाऊस झाला. या पावसामुळे नुकसान झालेल्या वैजापूर तालुक्यातील 1 लाख 30 हजार 187 शेतकऱ्यांना 106 कोटी 24 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर झाली होती.मात्र, 80 कोटी 4 लाख 86 हजार रुपये एवढाच निधी वितरणासाठी प्राप्त झाला असल्याने अनुदानाच्या 75 टक्केच रक्कम सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याचे समजते.
वैजापूर तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या अनुदानाच्या रकमेपैकी 51 कोटी 39 लाख 37 हजार 496 रुपये गुरुवारी (ता.5) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये जमा करण्यात आले आहे.बँकेच्या विविध शाखा व त्यामध्ये जमा झालेली अनुदानाची रक्कम पुढील प्रमाणे..
शाखांचे नाव जमा झालेली रक्कम (कोटींमध्ये )
मार्केट यार्ड, वैजापूर 10,71,03,007
लाडगांव 3,28,74,113
वीरगांव 2,43,55,275
महालगांव 6,41,45,033
दहेगांव 1,18,11,188
परसोडा 1,00,78,500
धोंदलगाव 92,96,600
लासुरगांव 2,36,07,905
गारज 3,12,39,495
मनूर 1,62,84050
शिऊर 5,68,35,000
लोणी 5,16,18,325
खंडाळा 5,27,84,700
माळीघोगरगांव 2,19,042,75
एकूण रक्कम 51,39,37,496
या व्यतिरिक्त काही राष्ट्रीयकृत बँका मध्येही अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.