भोकरदन सहकारी खरेदी विक्रीच्या चेअरमन पदावर भाजपचे विलास जगन्नाथ आडगांवकर यांची बिनविरोध निवड

जालना ,२४ जानेवारी /प्रतिनिधी :- भोकरदन तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदावर भाजपचे विलास जगन्नाथ आडगांवकर आणि व्हाईस चेअरमन पदावर  उत्तम धोंडीबा शिंदे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब  दानवे,  आ.संतोष पाटील दानवे, निर्मला  दानवे, जि.प.सदस्या आशा  पांडे, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमुख, कृ.उ.बा.समितीचे सभापती कौतीक  जगताप,  विनोद  गावंडे, भाजयुमो तालुका अध्यक्ष दिपक पा.जाधव, मुकेश चिने, भाजपा शहराध्यक्ष सतिष पा.रोकडे, भाजयुमो शहराध्यक्ष दिपक पा.मोरे यांनी अभिनंदन केले.
 संस्थेचे व्यवस्थापक राजेश जोशी, गणेश हिरेकर, कृ.उ.बा.समिती उपभापती रामलाल चव्हाण, बाजार समितीचे सचिव, संतोष ढाले, भायकर, कोलते, गायकवाड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्यने उपस्थित होते.