सुरेखाच्या चपाती प्रेमामुळे मांजरेकरानी सुद्धा सुरु केली नास्त्यात चपाती !

मुंबई ,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या घराघरात बिगबॉस 3 ची चर्चा सुरु आहे आणि मागचा आठवड्यात गाजल होत सुरेखाचं चपाती प्रेम . शनिवारच्या चावडीत महेश मांजरेकरांनी सर्वांचा समाचार घेतला. सुरेखाच्या चपाती प्रेमामुळे मांजरेकरांनी सुद्धा शेवटी सुरु केली नास्त्यात चपाती खायला.

सकळाच्या नास्त्यात दररोज पोहे बनत होते आणि ते खाऊन सुरेखाला आला कंटाळा  . पण करणार काय ? सगळे पोहे चुपचाप खात होते . शेवटी न राहवून तिने घरातल्या प्रत्येकाला  चपात्या खाणे कसे चांगले असते आणि ही सोनाली चपाती का नाही बनवत यावर बोलायला सुरु केलं . जे ती थांबेनाच. घरातील प्रत्येकाला पकडून पकडून तिने मला चपात्या हव्याच आहेत हे सांगितलं.शेवटी सोनालीला पण सांगितलं. मात्र घरात चपात्या काही झाल्या नाहीत.

शनिवारी चावडीमध्ये हाच मुद्दा महेश सरांनी उचलला आणि तिला सांगितलं.अग्ग, तुझ्या चपाती प्रेमामुळे आता मी सुद्धा नास्त्यात चपाती खायला लागलोय. तेव्हा सगळ्यांची हसुन लोटपोट झाली . सुरेखाने सुद्धा तिची कारण दिली . असे अनेक मजेशीर किस्से सध्या बिगबॉसच्या घरात सुरु आहेत तेव्हा पाहत रहा बिग बॉस मराठी फक्त कलर्स मराठी वर