नांदेड जिल्ह्यात 180 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू

205 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 6 :- मंगळवार 6 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 205 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 180 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 59 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 121 बाधित आले.

आजच्या एकुण 829 अहवालापैकी 611 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 632 एवढी झाली असून यातील 13 हजार 213 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 879 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 33 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात शनिवार 3 ऑक्टोंबर रोजी नांदेड कौठा येथील 75 वर्षाचा एका पुरुषाचा, 4 ऑक्टोंबर रोजी लेबर कॉलनी नांदेड येथील 80 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, तर 5 ऑक्टोंबर रोजी व्यंकटेशनगर नांदेड येथील 72 वर्षाचा एका पुरुषा, चीतगिरी भोकर येथील 84 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर अर्धापुर तालुक्यातील कामठा येथील 57 वर्षाचा एका पुरुषाचा, नायगाव येथील 50 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर 6 ऑक्टोंबर 2020 रोजी मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील 32 वर्षाचा एका पुरुषाचा, छत्रपती नगर नांदेड येथील 60 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान या आठ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 439 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 87 हजार 701,निगेटिव्ह स्वॅब- 68 हजार 047,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 16 हजार 632,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 13 हजार 213,एकूण मृत्यू संख्या- 439,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 82.53 आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 454, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 879,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 33.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.