विरोधकांचा ढोंगीपणाचा बुरखा फाडणार -विरोधी पक्ष नेता आमदार अंबादास दानवे

विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत

औरंगाबाद,१० ऑगस्ट  /प्रतिनिधी :- हिंदूहृदयसम्राट  सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार अंबादास दानवे यांचे पहिल्यांदाच जिल्ह्यात आगमन झाले यावेळी जिल्ह्यात जोरदार  जंगी स्वागत करण्यात आले.

May be an image of one or more people, people standing and outdoors

विरोधी पक्षनेता आमदार अंबादास दानवे शहरात येणार असल्याची बातमी येतात शहराचे मध्यवर्ती ठिकाण क्रांती चौक या ठिकाणी शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, भगव्या गुलालाची उधळण करत नाचत होते.

 यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना विरोधी पक्ष नेता आमदार अंबादास दानवे म्हणाले की ,मागील ३९ दिवसापासून राज्यात दोनच मंत्री काम करत होते या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, काही जिल्ह्यात रस्ते वाहून गेले, शाळेच्या इमारती पडल्या आहेत अशा परिस्थितीत दोन मंत्राच्या मंत्रिमंडळांनी कुठेही लक्ष दिले नाही याउलट फार्म हाऊस चे उद्घाटन, स्वतःच्या नावाचे गार्डनचे उद्घाटन, स्वागत समारोह यातच रमले आहेत. शेतकऱ्यांच्या, जनतेच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष दिले नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता होती परंतु जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत गेले. राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे, सरकारचा कोणताही धाक उरला नाही, प्रचंड महागाई वाढलेली असताना पेट्रोल डिझेलवरचा थातूरमातूर टॅक्स कमी करून महागाई कमी करत आहोत असे दाखवत आहेत, यामुळे तुम्ही करत असलेला ढोंगीपणा फार काळ टिकणार नाही आणि विरोधकांच्या या ढोंगीपणाचा विधिमंडळात आवाज उठवून बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ​ विरोधी पक्ष नेता आमदार दानवे यांनी केले.

May be an image of 1 person, standing, outdoors, crowd and text that says "TURT"

जिल्ह्यातील पाच आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात गद्दारी केली या गद्दारीच्या विरोधात शिवसेनेचा तीव्र लढा चालू असून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे संघटनात्मक मजबुती करणे सुरू असून या गद्दारांना निवडणुकीत निवडून येऊ देणार नाही असा संकल्प शिवसैनिकांनी केला आहे. राज्यात भाजपने प्रादेशिक पक्षांशी मैत्री करून फोडाफाडीचे राजकारण केले. देशात बऱ्याच राज्यात अशा प्रकारचं राजकारण भाजप करत आहेत, प्रादेशिक पक्ष संपवण्याचे स्वप्न पहात आहेत, परंतु बाकी पक्ष व शिवसेना यामध्ये बराच फरक आहे शिवसेना कुठेही डगमगणार नाही ताकदीने पुढे जाईल. जनता ही आता हुशार झाली आहे भाजपचे कुटील राजकारण जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ​अशा शब्दांत विरोधी पक्ष नेता आमदार दानवे यांनी विश्वास व्यक्त केला.

May be an image of 2 people, people standing and crowd

गंगापूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी तसेच बाबरगाव, दहेगाव बंगला येथे व्यापारी मार्केट कमिटी व उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, लक्ष्मण भाऊ सांगळे, दिनेश मुथा सुभाष कानडे, अंकुश सुंब, कालिदास पवार यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे शहरातील स्वागतप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर संतोष जेजुरकर विनायक पांडे शहरप्रमुख विजय वाघचौरे विश्वनाथ स्वामी ज्ञानेश्वर डांगे महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप सह संपर्क संघटक सुनीता देव आदींची उपस्थिती होती.