विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती

May be an image of 4 people, people standing and flower

मुंबई ,९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शिवसेनेला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून अधिकृच मान्यता देण्यात आली आहे. शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली आहे.महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून त्याबाबात अधिसूचना काढण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करूनच अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती माहिती अरविंद सावंत यांनी सोमवारी दिली होती. 

महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षीय बलाबल काय?
78 सदस्यीय महाराष्ट्र विधानपरिषदेत भाजपचे 24 सदस्य आहेत. शिवसेनेचे 12 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी 10 – 10 सदस्य आहेत. लोक भारती, पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचा प्रत्येकी एक एक सदस्य आहे. तर चार अपक्ष सदस्य आहेत. 15 जागा खाली आहेत.  

May be an image of 8 people and people standing

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया ​

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्षाने एक सर्वसामान्य शिवसैनिकावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेची जबाबदारी दिली, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मी मनापासून ऋणी आहे. त्यांनी व पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा घेऊन सरकारला धारेवर धरण्याची जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडेल. तसेच स्वतःच्या स्वार्थसाठी गद्दारी करत बनलेल्या या भ्रष्ट सरकारच्या विरोधात संघर्ष करु. पुढील काळ हा संघर्षाचा!