राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन? उद्धव ठाकरे म्हणाले…

रत्नागिरी,२१ मे /प्रतिनिधी:- 
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर केला आहे. तर राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक शहरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत आहे. मात्र तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यातील ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. यातच, १ जूनपर्यंत नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. ते रत्नागिरीत पत्रकरांशी बोलत म्हणाले,’राज्यातील काही क्ष्रेत्रामध्ये करोना रुग्णसंख्या वाढत आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेऊन आपण निर्बंध शिथील करू. यावेळी सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,’ असेही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाउन वाढणार का असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ‘सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीहा गाफील राहू नये. तत्पूर्वी, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लॉकडाउनवर भाष्य केले होते. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान राज्यातील लॉकडाऊन संदर्भात भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊन असला तरी, राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरू आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडणार, असे विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.