वैजापूर येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा

वैजापूर,२५ जुलै /प्रतिनिधी :-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे येथील लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये ह.भ.प. प्रदीप साळुंके यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी कीर्तनाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी पावसाळी हंगामामुळे गरजुंना छत्री वाटप करण्यात आली.  याप्रसंगी कीर्तन श्रवण करण्यासाठी भाविक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ह.भ.प. साळुंके महाराजांचे स्वागत केले.  या कार्यक्रमास भागीनाथ मगर, ॲड. प्रताप निंबाळकर, युवा नेते अजय पाटील चिकटगावकर, उत्तय निकम, दिनकर पवार,साईनाथ मतसागर, प्रशांत शिंदे, दिपकसिंह राजपूत, राजेंद्र मगर, प्रभाकर बारसे, रिखबचंद पाटणी, मंजाहारी गाढे , शैलश सुरासे, धिरजसिंग राजपूत, प्रेम राजपूत, दिगंबर मोरे ,राजू साळुंखे, अशोक म्हस्के, विशाल शेळके, हिराबाई जाधव, बाळा जाधव, जगदीश पवार ,लखन त्रिभुवन, अक्षय बुट्टे, सम्राट राजपूत, हरी कदम आदी उपस्थित होते.