वैजापूर येथील गोलवाडी येथे सभामंडपाच्या बांधकामाचे भूमीपूजन

वैजापूर ,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथील मांजरे वस्तीमधील  गणेश मंदिराच्या सभामंडप बांधकामासाठी 5 लक्ष रुपये मंजूर झाले असून,या बांधकामाचे भूमीपूजन  शनिवारी झाले. 

माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन पाटील वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, पंचायत समितीच्या सभापती सिनाताई मिसाळ, माजी जिल्हापरिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळयांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजनाचा कार्यक्रम  झाला.

या कार्यक्रमास शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मोहन पाटील साळुंके, किशोर पाटील हुमे, प्रविण सोनवणे, भाऊसाहेब पाटील शिंदे, अमोल पाटील बोरणारे, साहेबराव पाटील औताडे, राजूभाऊ छानवाल, जगन्नाथ पगार, बाळू पगार, भरत पाटील जगताप, प्रविण भाडाईत, संजू आहेर, संभाजी पाटील डुकरे, हरीभाऊ आदमाने, बाबुलाल मांजरे, गणेश डांगे, प्रदिप पाटील साळुंके, रमेश मेहर, सचीन ताजी, सुदाम ताजी, परसराम कहाटे, राजेंद्र पाटील डिके यांच्यासह  ग्रामस्थ उपस्थित होते.