आ. बोरणारे यांनी स्वखर्चाने केली अव्वलगाव-जातेगाव रस्त्याची दुरुस्ती

वैजापूर,२४ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात दौऱ्यावर असतांना अव्वलगाव -जातेगाव परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्याची व्यथा मांडली अन आ.रमेश पाटील बोरणारे यांनी स्व खर्चाने रस्त्याची दुरुस्ती करून दिली. सांगताच क्षणी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. 

आमदार रमेश पाटील हे आज तालुक्यात  दौऱ्यावर असताना अव्वलगाव आले असता आवलगाव ते जातेगाव (सटवाई) रस्त्यासंदर्भात अनेक समस्या प्रामुख्याने तेथील शेतकऱ्यांनी त्यांना सांगितल्या. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहे तसेच कांदा व शेती पिकातील वाहतुक करण्यासाठी रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले असता आ.बोरणारे यांनी त्याच क्षणी तत्काळ निर्णय घेवुन शेतकऱ्यांना रस्ता दुरुस्त करून देतो असे सांगितले आणि २०मिनिटातच स्वखर्चातून प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली. 
अजुनही तालुक्यातील रस्त्यासंदर्भात असणाऱ्या सर्व अडचणी आपण प्रामुख्याने सोडणार आहोत असे आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. याप्रसंगी राजेंद्र पाटील साळुंके, सरपंच दिपक पाटील सवाई, काकासाहेब पाटीलसवाई, जालिंदर सवाई, नानासाहेब राशिनकर, बाबासाहेब टुबे, भाऊसाहेब टबे, बहिरूनाथ काळे, राहुल सवाई, भगवान सवाई आदी शेतकरी उपस्थित होते.