छत्रपती शाहू पॉलिटेक्निकमध्ये आर्टीफिशीयल इंटेलिजन्सला केंद्र शासनाची मान्यता

औरंगाबाद,१२ जुलै /प्रतिनिधी :- कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक मध्ये आर्टीफिशीयल इंटेलिजन्स अँन्ड मशीन लर्नींग या शाखेला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) नवी दिल्ली कडून मान्यता मिळाली  आहे. या अभ्यासक्रमाकरिता  कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये अद्यायावत  व वातानुकूलित कॉम्प्युटर लॅब तयार केली असून याचा फायदा विदयार्थ्यांना  दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी होणार आहे .
    आर्टीफिशीयल  इंटेलिजन्स  हा फक्त एक शाखा नसून बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे शतक हे आर्टीफिशीयल इंटेलिजन्स या  तंत्रज्ञानाचे  म्हणून ओळखले जाईल  कारण याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. आज मशीन्स तोंडी आदेश समजतात,चित्रे ओळखतात,कार चालवितात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपध्दती पेक्षा बरेच काही चांगले कामे करतात. परंतु भरपूर लोकांना आर्टीफिशीयल इंटेलिजन्स म्हणजे काय हे माहीत  नाही. एआय हे एक टेक टिप्स कॉम्पुटर सायन्सचा एक भाग आहे . एआय ही यंत्रणा विशेषतः संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमतेची नक्कल करून काम करते. एआय तंत्रज्ञानाच्या साह्याने कोणतीही मशीन मनुष्यासारखे बोलू, वाचू किंवा कोणतीही गोष्ट सहज समजू शकते. जसे भाषा ओळखणे, विविध भाषेत बोलणे, आवाज ओळखणे, एकमेकांशी सवांद साधणे इत्यादी गोष्टी करू शकते. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाची योग्य रितीने सांगड घालून विदयार्थ्यांना त्याचे ज्ञान देण्याचे काम आर्टीफिशीयल  इंटेलिजन्सच्या माध्यमातून करता येईल असे मत प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी मांडले.              

इयत्ता दहावीपासून विदयार्थ्यांसाठी सदरील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी असून दि. १४ जुलै २०२२ ऑनलाईन पध्दतीने नोंदणी व कागदपत्रे  पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. विदयार्थ्यांना उज्वल  भवितव्य घडवण्यासाठी आर्टीफिशीयल इंटेलिजन्स हा एक उत्तम पर्याय आहे. तरी जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी केले. सदरील यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीत मुळे, सचिव  श्री.पदमाकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख व प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमधील सर्व विभागप्रमुख व स्टाफ यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

—————————-

मराठवाड्यासारख्या शैक्षणीक दृष्ट्या  दुर्लक्षीत झालेल्या भागातील  विदयार्थ्यांमध्ये शैक्षणीक गुणवत्ता वाढावी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व त्यामधून उत्कृष्ट दर्जाचे अभियंते तयार व्हावेत या उद्देशाने तसेच दूरदृष्टी ठेवून सदरील अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे .
सचिव पदमाकरराव मुळे

———————————–