दरवाढीविरोधात शिवसेनेने चौकाचौकात केलेल्या आंदोलनाने औरंगाबाद शहर दणाणले

औरंगाबाद,२८ मार्च /प्रतिनिधी :- केंद्रातील भाजप सरकार दररोज सातत्याने गॅस – पेट्रोल – डिझेल याची दरवाढ करत आहे. सतत पेट्रोल, डिझेल चे भाव वाढत असल्यामुळे सहाजिकच जीवनावश्यक रोजच्या लागणाऱ्या वस्तूंचे भावही वाढले आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती पूर्णतः कोलमडली असताना सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पण प्रचंड संताप निर्माण झाला आहे. नागरिकांचा संताप शिवसेना रस्त्यावर उतरून व्यक्त करत आहे आज दिनांक २८ मार्च रोजी शिवसेनेच्यावतीने चौका-चौकात या दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. पूर्व – पश्चिम – मध्य शहरात उपशहरप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे शहर दणाणून गेले.

शिवसेना मुकुंदवाडी शाखेच्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या महागाई विरोधात निदर्शने

शिवसेना मुकुंदवाडी शाखेच्या वतीने केंद्र सरकार विरोधात सततच्या गॅस पेट्रोल डिझेल च्या भाववाढी विरोधात आंदोलन तथा भव्य निदर्शने मुकुंदवाडी बस स्टॉप वरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर करण्यात आले त्यावेळी कार्यकर्त्यांनी वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महेंगा तेल,केंद्र सरकार हाय हाय,भाजपा सरकार हाय हाय, केंद्र सरकारच करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणून टाकला याप्रसंगी शहरप्रमुख बाबासाहेब डांगे,नगरसेवक कमलाकर जगताप,मनोज गांगवे,माजी महापौर सुनंदा कोल्हे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे,रमेश दहीहंडे,व्यापारी आघाडीचे शहरप्रमुख वल्लभ भंडारी,सदाशिव पुपुलवाड, विभागप्रमुख लक्ष्मण पिवळ,भाऊसाहेब राते, सोमिनाथ नवपुते, विष्णु गुंठाळ,नाना जगताप उपविभाग प्रमुख सतीश काळे,महादेव कोल्हे,नारायण बरकसे, पंडित बोरसे,दत्ता देहडराय,भगवान कोकाटे,भारत पाटील,सुरेश प्रशाद शाखाप्रमुख ज्ञानेश्वर लामदांडे,मोहन गावडे,राजु राऊत,शिवाजी रोकडे युवासेनेचे उपशहर अधिकारी प्रशांत कुऱ्हे, शशिकांत वाघ,रविंद्र जाधव,गणेश कोळगे, गजानन नागरे,विजय पदार,नितीन साळे,महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक दुर्गा भाटी,शहर संघटक भागुबाई शिरसाट, उपशहर संघटक रेखा शहा, विभाग संघटक नंदा काळवणे,आरती साळुंके आदी शिवसैनिकांची उपस्थीती होती.

कोकणवाडी चौकात आंदोलन
केंद्र सरकारच्या वतीने सततच्या पेट्रोल, डिझेल, गॅस भाववाढ विरोधात केंद्रातील भाजप सरकार विरोधात भव्य निदर्शने करण्यात आले यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख विजय वाघचौरे, नगरसेवक सिद्धांत शिरसाट,गिरीजाराम हाळनोर, उपशहरप्रमुख संजय बारवाल, राजू राजपूत,संरपच सचिन गरड, विभागप्रमुख सुधीर चौधरी, कन्हैया दैवतवाल ,प्रकाश कमलानी, अनिल बिरारे, विजय पैठणे, बंटी सोनवणे, पंकज वाडकर,कैलास राठोड नितीन पवार,गुड्डू बसनीवाल,दिनेश जीवनवाल, विनोद बनकर,सचिन वाहुलकर,महेंद्र जहिंगदार, संतोष बोर्डे पराग कुंडलवाल, सागर वाघचौरे, अजय राऊत,अशाराम,व शिवसैनिक उपस्थित होते.

कांचनवाडी नक्षत्रवाडी या ठिकाणी आंदोलन
भाववाढी विरोधात आज शिवसेना शाखा नक्षेत्रवाडी विटखेडा यांच्या वतीने कांचनवाडी चौकात भव्य निदर्षण करण्यात आले.शिवसेनेचे ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन कांबळे..शिवसेनेचे उपशहर प्रमुख वसंतभाई शर्मा..सतीश निक्कम..
शाखा प्रमुख बंडू वाघचौरे..विक्रम खडके..उपविभागप्रमुख बाबासाहेब अग्ले.. निलेश पाटील..कल्याण पोळ..सचिन शेटे..आदित्य खोमणे.संतोष सामसे..
महिला आघाडी च्या उपजिल्हा संगाठक अनिता ताई मंत्री..जयश्री इंदापूर..सारिका शर्मा.. पाडवे ताई..लता शेजवळ ताई..मंदा बनकर ताई.. योगिता कांबळे ताई..ममता खरात ताई
व शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

संभाजीनगर आयोजित गॅस पेट्रोल डिझेल सततच्या भाववाढी विरोधात
रेणुका माता मंदिर कमान सातारा परिसर भव्य निदर्शने
सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक ,महिला आघाडी युवासेना पदाधिकारी ,समस्त शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, उप शहरप्रमुख रमेश बाहुले, हरिभाऊ हिवाळे विभाग प्रमुख रणजित ढेपे, मनोज सोनवणे, युवा सेना उपशहर प्रमुख अजय चोपडे, शाखा प्रमुख संजीवन सरोदे, रामेश्र्वर पेंढारे , सतीश पारखे, शिवाजी शिंदे ,नितीन जरे ईश्वर पारखे, गुरु राजपूत, संतोष सपकाळ, महिला आघाडी उपशहर संघटक सविता निघोळे, माधुरी देशमुख, अलका काकडे.व पदाधिकारी उपस्थित होते.

त्रिमुर्ती चौक जवाहर कॉलनी
वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ त्रिमुत्री चौक येथे निदर्शने करण्यात आले, यावेळी शहर प्रमुख विजय वाघचौरे, शहर संघटक आशाताई दातार, उपशहर प्रमुख संजय पवार, रतन कुमार साबळे, विभागप्रमुख नंदु लबडे, युवा सेनेचे किरण तुपे, उपशहर संघटक सुचिता अंबेकर, उपविभाग प्रमुख हेमंत केवट, विनीश शामकुंवर, पंकज गुडदे, मुकुंद विभुते, विकी साळवे, मनीष मगरे, मा नगरसेवक रवींद्र गांगे, संतोष पडोळ, शाखाप्रमुख अनिल थोटे, गोरख सोनवणे, विभाग संघटक संगीता पवार, रोहिणी काळे, अनुसया ताई शिंदे, विशाल राऊत व शिवसैनिक उपस्थित होते.

अविष्कर चौक सिडको याठिकाणी भव्य निदर्शने
केंद्र सरकारच्या वतीने सततच्या पेट्रोल, डिझेल, गॅस भाववाढ विरोधात शिवसेना संभाजीनगरच्या वतीने केंद्रातील भाजप सरकार विरोधात भव्य निदर्शन करण्यात आले,शिवसेना विधानसभा संघटक रेणुकादास(राजुजी) वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी,अनिल जैस्वाल,मकरंद कुलकर्णी,वीरभद्र गादगे महिला आघाडीच्या जयश्री लुंगारे, विद्या अग्निहोत्री, शिव-अंगणवाडीच्या जिल्हा संघटक राखी सुरडकर,सीमा गवळी,अंजना गवई, मनीषा बिराजदार संगीता पाठक,विभागप्रमुख
सोपान बांगर,रघुनाथ शिंदे,रुस्तम चिमणे,चंद्रकांत गवई,विलास राऊत मधुकर वाघमारे, पंकज पाषाण,राजेंद्र बदर,संतोष कांबळे,मुन्ना राजपूत,धर्मराज गवळी,मोतीराम सुरडकर,शाखाप्रमुख बद्रीनाथ ठोंबरे,अरुण गव्हाड,नितीन अजमेरा,चंद्रकांत देवराज,रोहिदास पवार, उपशाखाप्रमुख कचरू कासार,अर्जुन बारवाल,शिवकुमार देशमुख,किशोर शेळके,आनंद लगडे,
रमेश ठोंबरे, मंगेश वाघ, सचिन राऊत, सागर राऊत, देवकर, संतोष दिक्षित, मंगेश जोझारे, आकक्ष गोझे, पवार नाना, अखिल शेख, बाळकृष्ण मते काका,तसेच परिसरातील शिवसैनिक नागरिक महिला तरुण मित्र मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पुंडलिक नगर हनुमान नगर या ठिकाणी आंदोलन
शिवसेना संभाजीनगर पूर्व च्या वतीने वाढत्या महागाई निमित्त केंद्र सरकारच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन शिवसेना विधानसभा संघटक पूर्व मा.श्री राजूभाऊ वैद्य व उपशहरप्रमुख मा.श्री संतोष खेडकें यांच्या नेतृत्वाखाली हनुमान चौक, पुंडलिक नगर येथे आज सकाळी 10 वाजता करण्यात आले
यावेळी मा.नगरसेवक सूर्यकांत जायभाये, मीनाताई गायके, गजानन मनगटे, आत्माराम पवार, विभागप्रमुख बापू कवळे, राजू चव्हाण , अजय गटाने,महिला आघाडीच्या मिराताई देशपांडे, सूर्यवंशी ताई, उपविभागप्रमुख जालिंदर शिरसाठ, छगन साबळे,अखिल शेख, शाखाप्रमुख कैलास तिवलकर, प्रशांत डीघुळे, भास्कर खेडकें, राम केकान, भरत ढवळे, आशिष खरात, साईनाथ जाधव, अर्जुन सरोसे, पाटील मामा, रामदास गायके, धनराज बनस्वाल,सिद्धार्थ वडमरे,विष्णू रोडगे पाटील, लक्ष्मण सोनवणे, मुरलीधर ससे, सुरेश मोढे, किशोर जाधव, शुभम साळवे, बाबर पटेल, संदीप भावसार, संदीप अहिरे, बंटी कचकुरे, राज नीळ, गणेश जैस्वाल, रामेश्वर चव्हाण, रामेश्वर मानकापे, लक्ष्मण बताडे, धनराज मांडवे, गजानन सरोसे, बिराज परदेशी, रमेश जोगस यांची उपस्थिती होती.

वीर सावरकर चौक समर्थ नगर या ठिकाणी निदर्शने

केंद्र सरकारच्या वतीने दररोज गॅस,पेट्रोल,डिझेल महाग होत असून त्यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने चौकाचौकात निदर्शनं करण्यात आले समर्थनगर सावरकर चौक येथे राजेंद्र दानवे उपशहरप्रमुख,आनंद तांदुळवाडीकर उपजिल्हाप्रमुख,गोपाळ कुलकर्णी विधानसभा संघटक, यांच्या नेतृत्वखाली सतीश कटकटे विभागप्रमुख, संजय लोहिया व्यापारी आघाडी, सुनिता सोनवणे उपशहरसंघटक,किरण शर्मा उपशहरसंघटक ,सुषमा यादगिरे विभागसंघटक, विरेंद्र वर्मा उपविभागप्रमुख,सचिन रिडलान उपविभागप्रमुख, रणजित दाभाडे शाखाप्रमुख,पंकज जोशी शाखाप्रमुख, सोमविर चव्हाण, अजिंक्य अवाड,राजेश चव्हाण,उमेश जाधव,ऋषी गावंडे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

महात्मा फुले चौक या ठिकाणी निदर्शने

केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईचा भडका उडाला असून सर्व सामान्य लोकांना जगणे मुश्किल झाली आहे . या विरोधात महात्मा फुले ,औरंगपुरा चौकत येथे उपशहरप्रमुख सुगंधकुमार गडवे,उप जिल्हा प्रमुख जयवंत (बंडू) ओक,विधान सभा संघटक गोपाळ कुलकर्णी यांच्या नेतृत्वा खाली शिवसेने महिला आघाडी सोनल प्रितेश (बंटी)जैस्वाल,मनीषा घोडके यांनी चहा बनवून केंद्र सरकार चा निषेध केला व तीव्र निदर्शने करुण घोषणाबाजी करण्यात आली .यावेळी विभाग प्रमुख विनायक देशमुख,सुधीर घाडगे,प्रकाश आहेरकर, किर्षणा पाटील,उपविभाग प्रमुख सुरेश अप्पा,साहेबराव साबळे, रमेश खरात ,सचिन नाईक,शाखा प्रमुख संदीप हेरे,मयूर कंटे,शाखा धिकरी संदीप सपकाळ, प्रितेश (बंटी)जैस्वाल, बाळू साळवे,संदीप आंधले,सुनील घोडके,मंगेश वाघमारे,निलेश घुले,,गणेश उचाडे ,विनोद उचाडे राजू मुर्तुजा, कुमार देशमुख,अंकित खंडेलवाल,मनीष बोरसे ,कल्पेश वरके,उमाकांत पोटे ,महेंद्र पाक, सागर वाघमारे,महेश वाघ,लखन राजपूत, अभिषेक नागोबा,हितेश सपकाळ,राम राजपूत व इतर शिवसैनिक पदाधिकारी ,नागरिक मोठ्या उपस्थित होते.