छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषि महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

औरंगाबाद ,१ जुलै  /प्रतिनिधी :-हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे शिल्पकार, समता, मानवतेसाठी झटणाऱ्या महामानवापैकी एक असणारे, सतत ११ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे  स्व वसंतराव नाईक यांची १०९ वी जयंती छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषि महाविद्यालय, कांचनवाडी येथे दि. ०१ जुलै २०२२ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ . श्रीकांत देशमुख, महाविद्यालयाचे संचालक/ प्राचार्य डॉ. दत्तात्रय शेळके आणि संस्थेचे मानव संसाधन अधिकारी श्री. अशोक आहेर यांच्या समवेत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण केले. त्यानंतर महाविद्यालयामध्ये  स्व  . वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस हार घालुन आदरांजली वाहिली. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. अतुल भोंडवे व महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वप्नील नजन यांनी या थोर व्यक्ती विषयी त्यांचे विचार व्यक्त केले.
त्याच बरोबर ग्रामीण जाणीव जागृती कार्यक्रमाअंतर्गत दत्तक घेतलेल्या १८ गावांमध्ये रावेच्या विद्यार्थ्यांनी कृषि दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केलेच त्याचबरोबर मुरमी, कापुसवाडी, लोहगाव, मुर्शीदाबादवाडी, गणोरी, मांडकी या ठिकाणी शेतक-यांशी विविध माध्यमातून (जसे की चित्रफित सादरीकरण, विषयतज्ञांचे मार्गदर्शन, पथनाटय आणि वेगवगळ्या घोषवाक्याने समृद्ध अशी कृषिदिंडी) संवाद साधला. अशा प्रकारे महाविद्यालयाच्या वतीने कृषि दिन साजरा करण्यात आला, या उत्साहात महाविद्यालयाचे संचालक तथा प्राचार्य डॉ. दत्तात्रय शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.