औरंगाबादचे “संभाजीनगर”नामांतर ; वैजापुरात सर्वपक्षीयांकडून स्वागत ; फटाके फोडून जल्लोष

वैजापूर ,२९ जून  /प्रतिनिधी :- औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचे आज वैजापूर शहरात सर्वपक्षीयांकडून स्वागत करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोस्तव साजरा केला.
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त समजताच वैजापूर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जमा होऊन फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच पेढे वाटून आनंदोस्तव साजरा केला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, उपतालुकप्रमुख महेश बुणगे, जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे, पालिकेतील शिवसेना गटनेता प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत शिंदे, नगरसेवक शैलेश चव्हाण, स्वप्नील जेजुरकर, माजी नगरसेवक लिमेश वाणी, कपिल खैरे, अमोल बोरणारे, संकेत वाणी, निलेश लाडवाणी, यशराज राजपूत, कृष्णा पाटोळे, अनिल न्हावले, गोरख गावडे, अमृत शिंदे, अक्षय साठे, शंकर मुळे, अरविंद साळुंके, शाम गावडे, बाबासाहेब महाजन, राजू वाणी, अजय वाणी, मिथुन बहिरट, मोहन वाणी, उत्कर्ष अनर्थे, बाबासाहेब कडे, कपिल पगारे, अक्षय मोटे, राहुल साळुंके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
पेढे वाटून आनंद साजरा…
शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते तथा वैजापूर बाजार समितीचे माजी सभापती ऍड.आसाराम पाटील रोठे यांनीही वसंत क्लबमध्ये पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते डॉ.व्ही.जी. शिंदे, मेजर सुभाष संचेती, पी.जी.पवार, प्रा.के.एम.मगर, संजय बत्तीसे, दत्तात्रय जाधव, पंढरीनाथ चव्हाण , गोपालदास आसर आदी यावेळी उपस्थित होते.