व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट ; वैजापुरात एकाविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,९ जून  /प्रतिनिधी :-मोहंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉट्सअप ग्रुप आक्षेपार्ह मजकुर टाकून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एकाविरूद्व वैजापूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.

याप्रकरणी मुजफ्फर मुनिर शेख (काजी गल्ली) यांनी तक्रार दिली. या तक्रारीनुसार संबंधित मोबाईलधारकाने स्वतः एडमिन असलेल्या राम पाटील मित्र मंडळ या व्हॉट्सअप ग्रुपवर मोहंमद पैगंबर यांच्याबाबत नुपुर शर्मा राष्ट्रीय वाहिनीवर केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत हा संदेश पाठवला. त्यावरुन मोबाईल धारकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत करीत आहेत.