वैजापूर तालुक्याचा बारावीचा निकाल 95.51 टक्के ; सहा महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के

वैजापूर ,९ जून  /प्रतिनिधी :-राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत वैजापूर तालुक्यातील 95.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली आहे. परिक्षा मंडळाने बुधवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर निकाल जाहीर केला. तालुक्यातील 31 केंद्रावर घेण्यात आलेल्या परिक्षेत चार हजार 594 परिक्षार्थी पैकी 95.51 टक्के म्हणजेच सुमारे चार हजार 388 परिक्षार्थी उत्तीर्ण झाले असुन यात 542 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत यश संपादन केले आहे. दोन हजार 386 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व एक हजार 375 विद्यार्थी द्वितिय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सहा महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

शहर व ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांचे निकाल पुढीलप्रमाणे: 
विनायकराव पाटील महाविद्यालय (92.92 टक्के), हल्क ए दवानायक उर्दु स्कुल 100 टक्के), विनायक ज्युनिअर कॉलेज, देवडोंगरी (86.36), संत बहिणाबाई ज्युनिअर कॉलेज, शिऊर (98.03 टक्के), न्यु हाईअर माध्यमिक विद्यालय, दहेगाव (94.87टक्के), विनायकराव पाटील माध्यमिक विद्यालय, लोणी (93.93 टक्के), विवेकानंद विद्यालय, गारज (97.50 टक्के), दादासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय, विरगाव (96.49 टक्के), भागिरथी माध्यमिक विद्यालय, नालेगाव (98.72 टक्के), माध्यमिक विद्यालय,लाडगाव (95 टक्के), शासकिय तंत्रनिकेतन (90.90 टक्के), संत जोसेफ विद्यालय, माळीघोगरगाव (100 टक्के), श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय, वाकला (95 टक्के), जिजाई कनिष्ठ महाविद्यालय, मनुर (96.21 टक्के), श्री. पारेश्वर विद्यालय, पालखेड (100 टक्के), राजे संभाजी माध्यमिक विद्यालय, आघूर (97.87 टक्के), भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, भटाणा (97.22टक्के), श्रीराम माध्यमिक विद्यालय, लाखणी (98.48 टक्के), छत्रपती शाहु माध्यमिक विद्यालय, वैजापूर (97.16 टक्के), मनुबाई माध्यमिक विद्यालय, मनेगाव (92.22 टक्के), कुलभुषण कनिष्ठ महाविद्यालय, खंडाळा (97.35 टक्के), श्री समर्थ विद्यालय, लाख खंडाळा (98.05 टक्के), न्यु हायस्कुल, धोंदलगाव (100 टक्के), रामेश्वर विद्यालय, बिलोणी (93.75 टक्के), न्युज हायस्कुल महालगाव (97.14 टक्के), कल्पतरु महाविद्यालय, परसोडा (80.76 टक्के), राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय, लासुरगाव (97.11 टक्के), दादासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालय (98.83 टक्के), संजीवनी कनिष्ठ महाविद्यालय (100 टक्के) छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (94.11 टक्के), गॅलेक्सी ग्लोबल स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, लोणी (100 टक्के)