वैजापूर येथील आरोहन किड्स शाळेच्या नवीन वास्तूचे उदघाटन

पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया दर्जेदार असावा – माजी नगराध्यक्ष साबेर खान 
वैजापूर ,९ जून  /प्रतिनिधी :-विद्यार्थी जीवनात दहावी व बारावीचे वर्ष हे उज्वल भवितव्याला चालना देणारे असते अशा शिक्षणाचा पाया पूर्व प्राथमिक स्थितीत गुणवता पूर्ण असेल तर विद्यार्थी आपली स्वप्नपूर्ती सहज साध्य करू शकतात असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी गुरुवारी (ता.9) येथील आरोहन किड्सच्या अत्याधुनिक शैक्षणिक व खेळाच्या साहित्याने सुसज्ज असलेल्या इमारतीतील पूर्व प्राथमिक वर्गाची पाहणी करताना केले.
या प्रसंगी माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत प्रमुख अतिथी म्हणून होते.त्यांनी या आरोहन किड्स मधील भरपूर अद्यावत शैक्षणिक साहित्य पाहून येथील पूर्व प्राथमिक वर्गाचे विद्यार्थी या देशाचे महान आदर्श नागरिक होऊन समाज व देशसेवेत अग्रेसर असतील असे वक्तव्य केले. या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्व  कौशल्याना विकसित करण्यासाठी  तज्ञ शिक्षक वृंद असून ते  सर्व उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांनी अधिकाधिक शैक्षणिक चित्रांचा  वापर करून अध्यापन प्रभावशाली करावे व मुलांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी परिपूर्ण  सकारात्मक शिक्षण देऊन पाया पक्का करावा तसेच त्यांच्या अंगी असलेली  विविध गुणात्मक कौशल्ये ही विकसित करावी असेही राजपूत म्हणाले. शहरातील आरोहण किड्सची नर्सरी ते पहिली पर्यंतची ही शाळा नव्या अत्याधुनिक शैक्षणिक सोयींनी परिपूर्ण आहे,या प्रसंगी डॉ,राजीव डोंगरे व डॉ.विजया राजीव डोंगरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रभाकर गुंजाळ नाना यांचीही उपस्थिती होती.