वैजापूर शहरात तुलसी रामायण कथा व साई पारायण मंडपाचे भूमीपूजन

वैजापूर ,२२ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर शहरात दरवर्षी होणाऱ्या साई पारायण निमित्त रामरावजी महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून आयोजित केलेल्या तुलसी रामायण कथेच्या व साई पारायण मंडपाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम रविवारी (ता.22) पार पडला. पूजनासाठी जितेंद्र चापानेरकर, राजेंद्र लालसरे, प्रेमसिंग राजपूत,  महेश जाधव, धीरज बोथरा, गिरीश भालेराव, ऋषिकेश आसर, जयेश भाटिया,जितू पवार, आकाश राजपूत, तुषार उचित, कमलेश आंबेकर यांनी सपत्नीक पूजन केले.

या प्रसंगी आमदार रमेश पाटील बोरणारे,भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, कैलास साखरे, काशिनाथ भावसार,गोविंद दाभाडे, ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत,नगरसेवक पारस घाटे, शैलेश चव्हाण, राजेश गायकवाड, शैलेश पोंदे, निलेश पारख, सुधीर लालसरे, सचिन राजपूत, गोकुळ पेहरकर, गणेश अनर्थे, केशव आंबेकर, सुनील बहिरुवाले, हरीश लालसरे, राम उचित, महेंद्र काटकर, उमेश राजपूत, ऋतिक राजपूत, गोटू बसवेकर, भरत उचित,आकाश राजपूत, जगदीश दायमा, श्रीनिवास सोनवणे,अमोल उशीर उपस्थित होते.