गट वाढीवर शिक्कामोर्तब: प्रभाग रचना जाहीर

खंडाळा हा नवीन गट

 
जफर ए.खान 

वैजापूर:- राज्य निवडणूक आयोगाच्या 10 मे 2022 च्या आदेशानुसार जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या व व्याप्ती निश्चित केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना 2 जून 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटवाढीवर शिक्कामोर्तब झाले असून औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या 62 वरून 70 वर गेली आहे. 2 ते 8 जून या कालावधीत हरकती व सूचना सादर करता येईल. त्यानंतर आलेल्या हरकती  विचारात घेण्यात येणारनाहीत.प्राप्त हरकती व सूचनांवर 22 जून रोजी सुनावणी होऊन अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल.औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या  तालुक्यानिहाय पुढीलप्रमाणे सोयगाव (3), सिल्लोड (10), कन्नड (9), फुलंब्री (5), खुलताबाद (3), वैजापूर (9), गंगापूर (10), औरंगाबाद (11), पैठण (10)

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षाच्या आजी-माजी सदस्यासह अनेक नवख्या इच्छुकांनी कंबर कसली आहे. गट व गणांचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यामुळे जिल्हा परिषदची निवडणूक लागण्याची शक्यता बळावली असून इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांची संख्या 8 वरून 9 वर गेली आहे. खंडाळा हा नवीन गट झाला आहे.